१ हो स्वर्गवासी सेराफिम

मराठी

१ हो स्वर्गवासी सेराफिम शुभ्र पवित्र करुबीम गाहो स्तोत्रें, हालेलूया हो सत्ताधारी दूतांनो, श्रेष्ठ स्वर्गीय शक्तींनो, गाहो स्तोत्रें, हालेलूया, हालेलूया, हालेलूया, हालेलूया २ सेराफ करुबाहुनी श्रेष्ठ शब्दाच्या जननी, तूं ख्रिस्तासीं स्तवायाला घेउनि स्वतां पुढाकार, वानी आमुचा तारणार हालेलूया ३ हो विश्रामस्थलवासी, साक्षी, संत गुणराशी, गा तुम्हीही हालेलूया, प्रेषितांनो द्या उत्तरें पूर्वज, प्रवक्ते सारे हालेलूया ४ गाऊं याहो, प्रिय बंधू स्तोत्रें दिव्य, देवा वंदूं, हालेलूया, हालेलूया, देवपित्या , देवपुत्रा सदात्म्या, त्र्येका पवित्रा हालेलूया