राजा येशू आला । राजा येशू आला ॥

मराठी

राजा येशू आला । राजा येशू आला ॥ सैतानाला जिंकायाला, । राजा, येशू आला घालवुनी पापें । णि दुःखें घोर ॥ पूर्ण शांती द्यावयाला, । राजा येशू आला आनंदी आनंद । झालों पापमुक्त ॥ मला शुद्ध करायाला, । राजा येशू आला वधस्त्तंभावरी । प्राण देता झाला । जगताचा त्राता झाला, । राजा येशू आला राजांचा तो राजा । प्रभूंचा तो प्रभु ॥ बोला सारे जयजय बोला, । राजा येशू आला !