मराठी
१०४ वंदनीय येशु
देवाला वंदा फार ,
वर्णा हो ऊपकार ,
गा ईश्वरा ;
नमा ख्रीस्तासमोर ,
भरीला दंड घोर ,
त्रिलोकी वंद्द थोर
तो कोकरा ... १
सर्वांनो, खाली वर ,
काढा हो उंच स्वर ,
गा ईश्वरा ;
रक्ताने मोलवान
झाला उद्धार जाण,
त्रिलोकी सुटीत मान
तो कोकरा ... २
स्वर्गात वंदिता
वानू प्रेमलता .
हे ईश्वरा ;
येशु सुवंद्य फार,
अनंत अधिकार
त्रिलोकी करणार
तो कोकरा .
एच. balentine