१०५. येशूची कृपा

मराठी

१०५. येशूची कृपा हे माझ्या जीवा, हो तत्पर, प्रभू येशूची स्तुती कर; सांगावी दया आवढी, कृपा येशुचि केवढी ! ... १ मला पातकी पहिले; तै त्याने हाति धरिले; तो चुकवितो दंड घोर; कृपा येशुचि किती थोर ! ... २ असंख्य शत्रू विक्राळ होता जीवास प्रतिकूळ, मला तो चालवी निर्भय, कृपा येशुचि अतिशय ... ३ जेव्हा आपत्ती येते थोर तेव्हा जीवास वाटे घोर ! तो होता तै मला आधार, कृपा येशुचि हि अपार ... ४ जरी बहुधा माझे मन येशुचि सोडी आठवण, तरी मला विसंबेना, कृपा येशुचि फिरेना ... ५ पुढे मी प्राण सोडिता गाईन ख्रिस्तममता, करीन हर्षे जयजय, कृपा येशुचि हि अक्षय ! ...६ एच .balentine