सदाश्रय ख्रिस्त

मराठी

१०६ सदाश्रय ख्रिस्त येशु जनावना तारक , पावना तू अत्युदार ; ऐकुनी प्रार्थना दावूनी करुणा , दे भक्तिभावना , मला तू तार ... १ शुद्ध मला करी , प्रेमे मनी भरी , दे पदी भाव ; तू मजकरिता त्या कृशी मरता केली जी ममता मला ती दाव ... २ येई विपत्ती थोर ; वाटे जीवास घोर तै चालवी ; संकट तू निवार ; दुखे संपूर्ण सार , होई जीवा आधार , तू शांतवी ... ३ आयुष्य संपता मी प्राण सोडिता हाति धरी ; दे अंती आश्रया , दूर करी भया दे , प्रभू , दे जया, मला तारी ! ...४ - ach. balentine