मराठी
१०७ उद्धारक ख्रिस्त
भक्तांनो , या प्रभूसमोर ,
प्रेमाने गा उद्धार ,
ख्रिस्ताची वर्णू कृपा थोर ,
तो वंद्य तारणार ... १
स्वर्गास त्याने सोडिले
धराया अवतार ,
अमोल्य रक्त ओतिले ,
तो वंद्य तारणार ... २
धारा सर्व प्रसंगी भाव ,
करी ,करी कैवार ,
प्रभूचे घ्या सुवंद्य नाव ,
तो वंद्य तारणार ... ३
टाळुनी त्वरे पाप घोर
स्वर्गात जाऊ पार ,
तेव्हा भेटेल मित्र थोर ,
तो वंद्य तारणार ... ४
- ach.balentine