ख्रीस्तराजाचे गौरव

मराठी

१०८ ख्रीस्तराजाचे गौरव येशूला तेज ईश्वरी , दूतांनो , माना थोर मुगुट घाला त्यावरी , नमा ख्रीस्तासमोर ... १ भक्तांनो , स्मरा अंतरी येशूचे ऊपकार , मुगुट घाला त्यावरी ; सदा गा हो उद्धार ... २ पाप्यांनो , तुम्ही सत्वरी येशूला दया हो मान , मुगुट घाला त्यावरी , तो राजा बलवान ... ३ सकल हो , दिगंतरी नमा येशुसमोर , मुगुट घाला त्यावरी , म्हणा , तो राजा थोर . -ach . balentine