मराठी
११० ख्रिस्तामुळे होणारा आनंद
सहर्ष स्तुती गा ,
हा येशु राजा थोर ,
आनंद बाळगा ,
उल्लासा त्यासमोर ;
स्तवा, भक्तांनो , ईश्वरा ,
अखंड उल्लासा करा ... १
येशूने अधिकार
त्रिलोकी स्थापिला ,
कधी न संपणार ,
देवाने नेमिला ;
स्तवा , भक्तानो , ईश्वरा ,
अखंड उल्लासा करा ... २
शत्रूस मारुनी
तो सत्ता चालवी ,
पापेही हारूनी
जीवाला शांतवी ;
स्तवा , भक्तानो , ईश्वरा ,
अखंड उल्लासा करा ... ३
तेजे उतरुनी
तो न्याय ठरवी ,
दिना उद्धरुनी
अत्यंत गौरवी ;
स्तवा , भक्तानो , ईश्वरा ,
अखंड उल्लासा करा ... ४
- ach . balentine