मराठी
१११ ख्रीस्तनामाचे माधुर्य
येशूचे नाम गोड फार
दीनांना लागते ,
ते दु:खे , भय अनिवार
नाहीशी करिते ... १
त्या नावे शांती भरती ,
अत्यंत समाधान ,
भुकेले तृप्ती पावती ,
दिना मिले कल्याण ... २
येशु हा माझ्या प्रार्थना
देवाला एकवी ,
दुष्टांच्या सर्व योजना
बळाने घालवी ... ३
येशु हा माझा मित्र जाण ,
पाठींबा , मेंढपाळ ,
गुरु , उपाध्या , दयावान ,
व राजाही तेजाल ... ४
हे प्रभू , माझी स्तवने
अत्यंत हलकी ,
गाईन स्वर्गी गायने
दूतान्च्यासारखी ... ५
आताही तुझी ममता
संगे मी सकळा,
अंतरी भरी शांतता
मरता दयाळा ...६
- ach balentine