मराठी
११३ उद्धारक येशु
नाम येशूचे आवडे ,
ते भय वारीते
ते प्रिय गोड केवढे !
ते शांत ठेविते ... १
येशूने मला तारिले ,
ऐसे विश्वासलो;
स्वरक्त त्याने पडिले ,
मी मुक्ती पावलो ... धृ
येशु स्वर्गाला त्यजुनि
पृथ्वीवरी आला ,
दुर्बलतेला घेउनि
दाखवी प्रेमाला ... 2
येशु दुष्टान्च्याकरिता
मध्यस्थी करिता
दु:खास झाला सोशीत
जे न ये वर्णिता ... ३
येशु मृत्यूला जिंकुनी
जिवंत जाहला ,
तो सकला उठवूनी
देईल मुक्तीला ... ४
- एस. बी .फेअरबँक