उत्तम मित्र ख्रिस्त

मराठी

११६ उत्तम मित्र ख्रिस्त येशु पहा मित्र कैसा, सर्वांपेक्षा ममताळ ! नाही सखा भाऊ तैसा , प्रीती करी सर्वकाळ आम्हा पाप्या तारण्याला कोणी मित्र मेला काय ? ख्रीस्ते अर्पुनी जीवाला केला पुरता उपाय ... १ तो जगाने तुच्छ केला , दीनबंधू त्याचे नाव , स्वर्गी आता जरी गेला , त्याचा तरी तोचि भाव ; तो भक्तांचे ऐकुनिया दे त्यांना पूर्णाधार, संकटी त्या पाहुनिया प्रेमे तो करी उद्धार ... २ प्रेमा जैसा आम्हा व्हावा तैसा प्रभू , वाढवी ; आम्ही का हो विसरावा येशु मित्र गौरवी ? जेव्हा स्वर्गलोकी जाऊ तेव्हा न विसंबणार, येशुकृपा तेथे गाऊ , सर्वकाळी वंद्णार ... ३ - ach. Balentine