मराठी
११७ प्रिय मित्र येशु
कोण मित्र येशुवाणी
सारे ओझे वहाया ?
सर्व दुखे तो ऐकुनी
साह्य करी सोसाय ;
त्याकडे कधी न जाता
आम्ही अवमानितो,
शांती खरी हरवूनी
शोक किती करितो ! ... १
मोह असले कि चिंता
काही दिसे त्रासाया ,
धैर्य नच सुटू देता
जा प्रभूला सांगाया ,
सर्व दुबळ्यास पाहे ,
चित्तवृत्ती जाणतो
मित्र प्रिय जसा आहे ,
'हात धरी ,' म्हणतो ... २
कष्टी जरी श्रमलेले ,
खांब जड वहाया ,
त्यासही उपाय केले ,
जा प्रभूला सांगाया ;
मित्र जरी तुच्छ मानी
जा प्रभूला सांगाया ;
तोचि सखा सर्वाहुनी
सिद्ध अंगीकाराया ... ३
- मेरी ई . बिसल