मराठी
११९ मायाळू मित्र
प्रिय प्रभू मित्र कसा,
वत्सल तो !
बंधू , सखा नसे तसा ,
वत्सल तो !
अन्य मित्र फसविती ,
विपत्काळी दगा देती ,
ख्रिस्त सदा करी प्रीती ,
वत्सल तो ! ... १
प्रभूप्रिती तुम्ही जाणा,
वत्सल तो,
प्रेमे ,प्रेमे त्याला माना,
वत्सल तो !
दुरित सकल सारी,
संकटेही दुरी वारी,
पूर्ण निजभक्त तारी,
वत्सल तो ! ... २
प्रभूवरी प्रीती करा,
वत्सल तो !
तत्पदी सदैव शिरा ,
वत्सल तो !
भय समूळ त्यजावे ,
प्रभू -जू सहर्ष घ्यावे,
प्रभूला अनुसरावे,
वत्सल तो ! ... ३
प्रभुपदी क्षमा मागा ,
वत्सल तो !
दु:खे संकटेही सांगा ,
वत्सल तो !
शुभवच सत्य देई ,
मृदुकारी पथि नेई ,
अंती स्वर्गसुखी घेई ,
वत्सल तो ! ... ४
- ach balentine