मराठी
१२० नाजरेथकर
हा कोण मोठा समुदाय ?
हे फार लोक, आहे काय ?
ते का उत्सुक दिसती ?
अशा त्वरे का चालती ?
आरोळी झाली, 'पहिला !
नाजोरी येशु चालला !' ... १
हा येशु कोण ? केवि तो
जना सदाची ओढितो ?
दिसे प्रवासी , केवि या
समर्थ तो मनावया ?
पुकारा हाची ऐकिला .
'नाजोरी येशु चालला .' ... २
येशूने देह घेतीला,
जनाचा भार वाहिला;
तो देई शक्ती नि:शक्त्ता,
आरोग्य देई पीडिता;
सहर्ष ऐके अंधळा
'नाजोरी येशु चालला .' ... ३
जागी अताही राहतो,
इथे अदृश्य फिरतो ,
पवित्र कर्मे पहिली
कि जाण येई जवळी;
म्हणा सर्वास, 'या वळा';
नाजोरी येशु चालला ... ४
श्रमी व लादलेले, या,
क्षमा,विश्रांती, शांती घ्या,
तू फिर वेगे,भटक्या ,
घरी बापाच्या जावया;
कैद्या,विमुक्ती तुजला,
'नाजोरी येशु चालला' ... ५
कृपा अति प्रभूची थोर;
नमा, नमा तयासमोर !
कृपा जी तुच्छ मानिली
न जाणे वेळ टाळीली;
पुढे तुम्हास तो त्यजी,
नमा,भजा त्या अजी ... ६
- मेरी ई. बिसल