मराठी
१२१ सन्मित्र ( check the wordings might be wrong capture through camera and written in office)
सन्मित्रा मानवाच्या तू येथे
आलासी स्वीकारोनी दिनते
घोरा हराया, पापा, पाशाते,
बंधूंच्या दु:खाते, दरिद्रते ... १
विघ्नांची खाण रात्री ज्या लोकां
नित्याची, सन्मार्गा जे चुकती,
तू त्यांची दिसी, तू त्यांची राका
येणे तुझिया ठायी रंगे मती ! ... २
ख्रिस्ता,जीवना ,मार्गा,तेजा,
संताही जाणीत्या हे सत्पथा,
प्रेमाने ज्यांची ती साजे आशा,
प्रार्थिती भासे, त्या तू रक्षिता ... ३
ह्या तेजे, जीवने, ह्या मार्गाने,
विश्रांती लाघे त्या दीर्घ श्रमी,
दु:खे ती सोमये होती प्रेमाने,
तू सारे ! ख्रिस्ता, तूते मी नमी !
- ना.वा.टिळक