मराठी
१२३ ख्रिस्तकृपा ( check the wordings might be wrong capture through camera and written in office)
ख्रिस्तकृपेचा उपाय
मजसाठी आहे काय ?
देव राग सोडी काय ?
पापीयास तारी काय ? ... १
होय,हि कृपा अपार,
येशु पाप्या तारणार,
पाप्यास येशु तुलाही तारणार ... धृ
केवि मी अव्हेरिले
केवि त्या चीढविले ?
त्याचा शब्द ऐकेना,
दु:ख देई, राहीना ... २
शोक मी आता करी
कि मी नच फितुरी;
जाऊ गोडी पापाची,
आस लागु येशूची ... ३
बाप कळवळतो,
चित्ती खेद पाहतो,
बोले 'केवि टाकू या ?'
मान्य होई ताराया ... ४
ख्रिस्त वात पाहतो,
हात कूस दावितो,
त्याची प्रीती कळली,
ती कृपा अनुभविली ... ५
- मरी ई. बिसल