मराठी
१२५ पाप्याचा सदाश्रय ( check the wordings might be wrong capture through camera and written in office)
देवाची गाऊ करुणा,
स्तवु उद्धारयोजना,
कृपानिधीच तो खरा,
पाप्यांना झाला आसरा ... १
मी पातकी किती अघोर,
असे देवाशी हटटखोर,
कठीण ठेउनी हृदय
धिक्कारीला तो सदाश्रय ... २
पापानि व्याप्त राहुनी
अंधारा गोड मानुनी
कुमार्गी चाललो निर्भय,
मी तुच्छ केला सदाश्रय ... ३
तयाधी देव करुणा
मलाही बुडू देईना,
जीवाला वाटे दंडमय,
मला दिसेना सदाश्रय ... ४
टाळावा क्रोध ईश्वरी
पळालो सीना डोंगरी,
तै वाणी ऐकिली निर्दय,
'मिळेना येथे सदाश्रय ... ५
पुढे प्रभा मी पहिली,
आकाशवाणी ऐकिली,
येशु हा तारितो निश्चय,
तया मी केला पूर्णाश्रय ... ६
- एच balentine