मराठी
126 येशूविषयी लाज न धरणे
संपूर्ण जगादेखता
ख्रिस्ताला धरी मी,
तयाची वार्ता सांगता
लज्जा न मानी मी ... 1
ख्रिस्तराये मला पामरा तारिले
दिव्य तेज मम मानी घातले
दृष्टी विश्वासें हृदयी पावलो
आनंदी सुखी मी जाहलो ... ध्रु
हे नाम येशू गोड फार,
तो माझा पूर्णाश्रय
नाही मला तो टाकणार,
त्या ठायी मी निर्भय ... 2
तया जीवात्मा सोपीला,
सदा तो रक्षणार,
तो न्यायकाळीही मला
नाहीच सोडणार ... 3
मलाही तो देवासमोर
प्रेमाने पत्करील,
स्वर्गात माझा हर्ष थोर
अक्षय वाढावील ... 4
-एच . balentine