127 तारकाची प्राप्ती

मराठी

127 तारकाची प्राप्ती प्रभू येशूची मोठी प्रीती जणी वर्णिता मी ऐकिले मज ती पतितावरी होती हेही ऐकाया फारच इच्छिले, हेही ऐकाया इच्छिले ... 1 त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली; स्वर्गातुनी येउनी प्राणही अर्पूनि प्रीती सर्वा दाविली ... ध्रु दु:खे राहिली ख्रिस्ते कैशी ! तळमळला खांबावरी; मज ऐकुनी सुचे मनाशी मजसाठीच सोशिलि ती खरी ! मजसाठीच ती खरी ! ... 2 शरणागत भावे ख्रिस्ता रमती सुखसागरी ते, देई ख्रिस्त अशा स्थळ स्वतां, मजला प्रभू देईल काय ते ! मज देईल काय ते ? ... 3 प्रभू तू , प्रिय ,उत्तर द्यावे, मज कोणी न तुजशिवाय ! सदात्म्याने मळ कळवावे मज तारण देशी कृपेने काय ? मज तारण देशी काय ? ... 4 'तारिले तुलाही मी ' तारिले तुला; शरणागत त्यास मी तारण देई ,-- देई,पतिता, तुजला ... ध्रु -मेरी ई. बिसल