मराठी
128 साहाय्यकर्ता ख्रिस्त
मी प्रभू ख्रिस्तावरी
पापाचा टाकी भार,
मला तो मुक्त करी,
भाराला साहणार;
मी आणि ख्रिस्तापाशी
अन्याय सगळे,
तयाने खोडायासी
स्वरक्त योजिले ... 1
मी ख्रिस्ताकडे येई
गरजा सांगाया,
मला तो तृप्ती देई
संपत्ती की तया;
त्यापाशी आणि चिंता
व दु:खे मनस्वी,
समदु:खी तो होऊनि
मनाला शांतवी ... 2
लहरीसटपरी मी व्हावे
सदगुणा धरुनी,
मी लेकरू ठरावे
बापाला मानुनी;
त्यापाशी मी राहावे
स्वर्गाला जाउनी,
तै ख्रिस्तनाम गावे
दूतांशी मिळुनी ... 3
-मेरी ई. बिसल