129 ख्रिस्तावतार

मराठी

129 ख्रिस्तावतार देवाचा शब्द हो तेजाळ होता प्रारंभी वैभवी, देवाशी राहे सर्वकाळ, स्वताही देव गौरवी ... 1 तो त्याच्या गौरवाचे तेज व तत्वतेची प्रतिमा, गुणी दिसे न त्या तुला, देवासमान महिमा ... 2 कर्ता जगात तोच थोर, तो सर्व सृष्टी वागवी, नमा नमा तयासमोर ! सत्ता त्रिलोकी चालवी ... 3 तो शब्द देह जाहला, मनुष्य रूप घेतीले, जनाशी प्रेमे वर्तला, प्रभूचे तेज दाविले ... 4 येशूमुखा मनोहरा, देवाचा तो एकुलता, हा येशू शोभे ईश्वरा, कृपा किती ही सत्यता ! ... 5 - एच balentie