मराठी
130 ख्रिस्तजयंती
दिव्य तेज फाकवूनि
दूत ये प्रकाशमान,
भीत मेंढके बघोनी
तो म्हणे सत्प्रेमवान ---
'का भिता ? सुवृत्त देई,
आज ख्रिस्त जन्मला !
दाविदाच्या गावी पाही
गोष्ठीमाजी निजला ... 1
एकाएकी मेंढक्यास
दूतसैन्य दिसले,
वंदिताती ईश्वरास,
ते तयांनी ऐकिले;
ईश्वराची होउ स्तुती,
उंच उंच वाढवा,
पृथ्वीमाजी होउ शांती,
देवकृपा गाजवा ... 2
'ख्रिस्तराय जगद्गुरू,
तो उपाध्याही महान
हो नका तया धिक्कारू,
भक्तजन, द्या सन्मान,
ह्या जगास तारण्यास
देव घेई अवतार,
हे सुवृत्त सांगण्यास
दूत हर्षले अपार ... 3
- एच balentine