131 मेंढपाळास दूतांचा निरोप

मराठी

131 मेंढपाळास दूतांचा निरोप निवांत रात्र; राखिती सुखे व्रजाप्रती व्रजेश तेज पाहती असह्य ते अति; अपुर्व दूतदर्शने मनात ते भीती; परंतु दूतभाषने पुन्हा स्थिरावती ... 1 'भिऊ नका ! ' वदे तया सहास्य दूत तो; करी प्रभू पुरी दया ! सुवृत्त सांगतो; समस्त मानवाप्रती सुखास अर्पिती घडे नवीन गोष्ट ती जगात संप्रती ! ... 2 प्रभू जगास तारिता जगात जन्मला ! चला, पहावया अता सहर्ष त्याजला; पुरीत दाविदाचिया कुळात त्याचिया पहाल बाळका तया, त्यजाल संशया ... 3 'नमा स्वभाव त्याजला खुणेस सांगतो, गव्हाणीमाजी निजला दिसेल बाळ तो; पवित्र, दिव्य बाळ तो मनुष्य जाहला, बघाल लक्तकांत तो जपून ठेविला !' ... 4 निरोप दूत देऊनी दिसे न त्याप्रती, परंतु दिव्य गायनीं नभे दणाणती; जयोsस्तु , ईश्वरा, तुला ! सुशांती पृथ्वीला, कृपा नरी सुमंगला, अनंत, निर्मला.' ... 5 - ना.वा.टिळक