मराठी
132 ख्रिस्तजयंती
शांती असो पृथ्वीवरी ,
जनीही प्रसाद ईश्वरी,
येशूने जन्म घेतला,
सहर्ष दूतांनी गाइला ... 1
जण हो गा हर्ष करा,
विलीन व्हा प्रभूसमोर,
प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर ... ध्रु
'शांती असो' ते गर्जती,
ते महिमा ईश्वरा देती,
दिसती खून ही खरी
तो तारा बेथलेहेमावरी ... 2
'तारक येई !' वार्ता ती,
ती ध्वनी सर्वत्र गाजती;
मुलेही दूतसंगती
येशूला स्तवुनी वर्णिती ... 3
स्तवूत ख्रिस्त लेकरे,
वदे की,ही माझी कोकरे
घेई तया तो निजकरी;
आताही तशीच प्रीती करी ... 4
- मेरी ई. बिसल