मराठी
133 ख्रिस्तजयंती
पाहा ख्रिस्त जन्मला,
जगदगुरु एकला !
दूत त्यास स्तविती,
प्रभू,राजा वर्णिती;
सारा मान द्या त्याला
त्या सुवंद्य देवाला,
अवतार घेतिला,
बेथलेहेमी जन्मला ... 1
शांती पृथ्वीवरी फार,
माणसा कृपा अपार
आला ख्रिस्त द्यावया,
राष्ट्रांनो, नमया या;
तो लोकांत राहिला,
प्रेमे त्यांशी वर्तला,
तरी भिन्न त्यांहूनि
शुद्ध तो आचरणी ... 2
आला ख्रिस्त ताराया,
या हो त्यास स्तवाया,
त्याने दु:खे साहिली
तोचि आमुचा वाली;
पाहा ख्रिस्त जन्मला;
जगदगुरु एकला,
दूत त्यास स्तविती
प्रभू ,राजा, वर्णिती ... 3
- मेरी ई. बिसेल