134 पूर्वेकडील तारा

मराठी

134 पूर्वेकडील तारा तेजस्वी ताऱ्या, तू ये उदयाला दूर करावा निबिड अंधार, येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदुद्धार ... 1 जागा मिळेना त्या बाळ येशूला, गोष्ठीत ठेवी ती कर्ता महान, येऊनि दूत समर्थ प्रभूला गाउनी स्तोत्रे देताती सन्मान ...2 आम्ही जगाच्या राजास अर्पाया भरती अमूल्य आणाव्या की काय ? ख्रिस्त येशूच्या कृपेला पावाया चाले कधी न द्रव्याचा उपाय ... 3 सोने की रत्ने ही अर्पणे व्यर्थ, प्रेम अर्पावे हे आवडे फार ख्रिस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ, दीनांच्या प्रार्थना प्रिय अपार ... 4 तेजस्वी ताऱ्या, तू ये उदयाला दूर करावा निबिड अंधार, येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदुद्धार ... 5 - एच .balentine