मराठी
135 वधस्तंभाला खिळलेला ख्रिस्त
क्रुसास एक टांगला,
तो सोशी दु:खाते,
समोर पाहता झाला
मला तो पाप्याते ... 1
तया मुखास पाही तो
ते खिन्न दिसले,
मला तो दोष लावितो,
असेच भासले ... 2
माझाही दंड देउनी
त्या स्तंभी कन्हला,
हृदि बघुनी खोचुनी
मी तो स्वीकारीला ... 3
कुठे आता मी लपणार ?
मी घातकी ठरे,
असे मनात भीती फार,
भरेही कापरे ... 4
माझ्याकडेस पाहुनी
दिला प्रभू ने धीर,
म्हणे, 'तुझ्याच करणी
गळे, पहा, रुधिर ! ' ... 5
अघोर दंड साहुनी
तो दावी पाप घोर,
क्षमा करुनि पापिया
कृपाही दावी थोर ... 6
-एच balentine