136 दु:ख सहन करणारा ख्रिस्त

मराठी

136 दु:ख सहन करणारा ख्रिस्त अहाहा ! माझा प्रभू थोर त्या खांबी मारिला; माझ्या पापांचा दंड घोर तयास लाविला ... 1 तो माझे पाप पाहुनी त्या खांबी कन्हला; प्रीती अपूर्व ही जनीं सीमा नसे तिला ... 2 कर्त्याने क्लेश भोगिले साधाया जनोद्धार, सूर्याने तेज झाकिले तै साजे तो अंधार ... 3 मी त्या खांबास पाहुनी मुखाते झाकीतो, प्रभूचे दु:ख स्मरुनी अत्यंत रडतो ... 4 हे तुझे प्रेम केवढे ! ऋणांस याचिया प्रभू , हे अश्रू कोरडे, न शक्त फेडाया ... 5 - एच balentine