मराठी
137 अर्पिलेला कोकरा
क्रुसास येशू टांगला,
अर्पिलेला कोकरा !
स्तवू त्या स्तुत्य येशूला,
अर्पिलेला कोकरा ! ... 1
अत्यंत प्रिय कोकरा !
हे येशू नाम हो मधुर ,
ऐकुनी वाहे प्रेमपूर,
अर्पिलेला कोकरा ! ... ध्रु
मदीय पाप वाहिले.
अर्पिलेला कोकरा !
मला ह्या नांवे तारिले,
अर्पिलेला कोकरा ! ... 2
क्षमा पापांची पावलो,
अर्पिलेला कोकरा !
अता स्वर्गास चाललो,
अर्पिलेला कोकरा ! ... 3
ही सारी दु:खे संपुनि,
अर्पिलेला कोकरा !
सदा स्तवीन गाऊनी
अर्पिलेला कोकरा ! ... 4
-मेरी ई. बिसल