मराठी
138 ख्रिस्त आमचा कित्ता
जा गेथसेमनीकडे
मोहपाश लागता;
पाही त्या प्रभूकडे,
जिंकी दु:खे सोशिता;
जाणे याच्या भावना .
शिके त्याची प्रार्थना ... 1
न्यायगृही संगे जा,
पाही कैसे छळीती;
क्लेश किती त्या राजा,
मारुनिया थुंकती !
तू छळासी सोस रे,
कित्ता त्याचा घे त्वरे ... 2
काल्वरीस जा, मना,
तेथे पूजी येशूला;
पाही मृत्यूवेदना
देवयज्ञ हा झाला !
'पूर्ण झाले !' वाणी तू
ऐके, जिंकीही मृत्यू ! ... 3
-- एच. balentine