139 उध्दारमार्गाची पूर्णता

मराठी

139 उध्दारमार्गाची पूर्णता येशू प्राणा सोडितांना केवि काय बोले तो ? भूमि, पाहा, कापतांना अंधकार घेरितो; ' पूर्ण झाले ' कण्हूनिया बोले तो ... 1 ' पूर्ण झाले ' बोलुनिया दैवी दु:ख संपते; पूर्ण त्राणा साधुनिया स्वर्गसौख्य मिळते ; ' पूर्ण झाले . ' भक्तां सौख्य मिळते ... 2 नेमशास्त्र पूर्ण, विधी, यज्ञ, रीती, दाखले, पूर्ण जे भविष्यवादी प्रेरणेने बोलले, ' पूर्ण झाले. ' दंडभय वारिले ... 3 गा स्तुती हो, मानवांनो, ख्रिस्तनाम गाजवा; आकाशाच्या आकाशांनो, मोठी कीर्ती वाढवा, हालेलूया ! देवकृपा कळवा ... 4 - एच. balentine