मराठी
140 ख्रिस्तकार्याची पूर्णता
' पूर्ण झाले, ' बोलुनी
येशू गेला मरुनी,
पूर्ण जया पावला
पूर्णोध्दार साधिला ... 1
पूर्ण झाले सगळे
जे साधूंनी शिक्षिले;
भाका पूर्वी दिधल्या
ख्रिस्ते पूर्ण केलिया ... 2
पूर्ण बली अर्पणे,
पशुरक्ता शिंपणे,
पूर्ण विधी, दाखले,
नेमशास्त्र सगळे ... 3
पूर्ण झाली खंडणी
ख्रिस्ते दिली भरुनी,
तेणे पापा हरितो,
माणसांना तारितो ... 4
पूर्ण दिसे ममता,
ईश्वराची सत्यता,
शत्रूशक्ती मोडिली,
शांति जगी स्थापिली ... 5
' पूर्ण झाले, ' कळवा,
देशोदेशी गाजवा,
येशू पूर्ण तारितो;
सर्वसत्ताधारी तो ... 6
- एच. balentine
_________________________________________________
141 ख्रिस्ताचे मरण
तो प्रभू माझा, तो प्रभू माझा ,
तो प्रभू माझा महान,
पाप्यांसाठी मरुनी
देई रक्ते खंडणी
मिळवाया उध्दाराचे दान ... 1
खांबी खिळीला,खांबी खिळीला,
सोशिले दु:ख अघोर
वेदनांनी गळुनी
प्राण दिला सोडूनि
करुणा जगी दाविली थोर ... 2
अंधार झाला, अंधार झाला,
गाढ पदे अंधकार
सूर्य तेजा देईना,
त्या कुकर्मा पाहीना
जगे अन्याय केला अपार ... 3
प्रभू समर्थ, प्रभू समर्थ,
प्रभू समर्थ महान,
मृत्यूबंद तोडुनी
स्वर्गी गेला चढुनी
तेथे पावे सन्मान ... 4
प्रार्थितसें तै, प्रार्थितसें तै,
प्रार्थितसें पितया,
' खांबी, बापा, मरूनी
दंड देई भरुनी,
प्रतितास क्षमा करी या.' ... 5
' क्षमा करी मी, क्षमा करी मी,'
बाप म्हणे तै प्रेमळ.
' घेति जे जे तुझे नाव
चित्ती धरुनी सुभाव
निश्चये तरती ते सकल ... 6
- एच. Balentine