मराठी
142 मृत्युंजय ख्रिस्त
पाप्यांचा मित्र मरतो,
सभोवते ते रडती,
अंधार मोठा पडतो.
थरारा भूमी कंपती ... 1
रडा, हो पापी, पाहता,
पाप्यान्चा भार साहे तो,
पाप्यानसाठीच मरता
रक्ताचा ओघ वाहे तो ... 2
अपार दु:खे सोसूनी
येशूने प्राण सोडिला
प्रभूला पाही फिरुनी,
तो आता पुंन्हा उठला ! ... 3
थड्याला सोडी यशस्वी
तो चढला अधांतरी,
दूतांचे सैन्य तेजस्वी
देते सन्मान ईश्वरी ... 4
भक्तांनो, नको रडणे;
पाप्यांचा तो कैवारी थोर
करा हो मोठी स्तवने,
पाप्यांचा साधिला उध्दार ... 5
हे येशू राजा वैभवी,
जगाला तू उध्दारीले,
हे मृत्यू, तुझे सारे भय
ख्रिस्ताने स्वता सारिलें ... 6
- एच. Balentine