मराठी
143 ख्रिस्ताचे पुनरुत्थान
हर्ष पूर्ण जाहला,
हालेलूया !
आज ख्रिस्त उठला,
हालेलूया !
दु:खे सोसूनी अपार,
हालेलूया !
त्याने साधिला उध्दार,
हालेलूया ! ... 1
ख्रिस्त राजा वैभवी,
हालेलूया !
त्याची सस्तुती गावी
हालेलूया !
त्याने पाप्या तारिले,
हालेलूया !
क्रूस थडे भोगिले,
हालेलूया ! ... 2
त्याने पूर्ण खंडणी,
हालेलूया !
केली दु:खे साहुनी,
हालेलूया !
आता स्वर्गी तो पती
हालेलूया !
त्याला दूत स्तविती,
हालेलूया ! ... 3
- जे. टेलर