144 ख्रिस्ताचे पुनरुत्थान

मराठी

144 ख्रिस्ताचे पुनरुत्थान पाहा येशू उठला. जयजयकार करा हो ! दिव्यदेह जाहला; जयजयकार करा हो ! हर्ष करा खाली वर, जयजयकार करा हो ! राजा तोचि परात्पर, जयजयकार करा हो ! ... 1 ख्रिस्ते साधिला उध्दार, जयजयकार करा हो ! दु:खे सोशिलि अपार, जय, इ. पूर्ण दंड भरीला, जय, इ. तारणारा जाहला, जय, इ. ... 2 व्यर्थ धोंड लोटिली, जयजयकार करा हो ! व्यर्थ मुद्रा मारिली, जय, इ. व्यर्थ पहारेकरी, जय, इ. ठेविले थड्यावरी, जय, इ. ... 3 ख्रिस्ते बंदा तोडिले, जयजयकार करा हो ! मृत्यूबळा मोडिले, जय, इ. शत्रुसैन्ये जिंकिली, जय, इ. सारी सत्ता घेतली, जय, इ. ... 4 आता येशू जगतो, जयजयकार करा हो ! सर्वकाळपावेतो, जय, इ. गेले गेले मृत्यूभय ! जय, इ. सारे गाऊ जयजय ! जय, इ... 5 - एच. Balentine