145 ख्रिस्ताचे पुनरुत्थान

मराठी

145 ख्रिस्ताचे पुनरुत्थान धन्य हा पवित्र वार सौख्य देणारा अपार ! धैर्य आशा ही गेली, ख्रिस्तासंगे पुरली, आजी हर्ष जाहला, ख्रिस्तराजा उठला ! ... 1 ख्रिस्त राजा विक्रमी त्यापुढे सारे कमी, मृत्यूलाही जिंकिले, सर्व शत्रू पळाले; आजी हर्ष जाहला, ख्रिस्तराजा उठला ! ... 2 आजी जाऊ देवळी, रामू ख्रिस्ताजवळी प्रभू स्वता येऊनि भेटेल त्या सदनी; आजी हर्ष जाहला, ख्रिस्तराजा उठला ! ... 3 ख्रिस्ते मृत्यू जिंकला, त्याचा व्यूह मोडीला; मृत्यू घोर नाशिला, ख्रिस्तामागे लोपला ! ख्रिस्तराजा उठला, दीननाथ शोभला ! ... 4 - एच. Balentine