मराठी
146 ख्रिस्ताचे पुनरुत्थान
ध्रु. हालेलूया ! हालेलूया !
हालेलूया !
आबालवृद्ध गाऊ गीत,
ह्या दिनी उठला खचित
स्वर्गाचा राजा विराजित.
हालेलूया ! ... 1
भाविक स्त्रिया ह्या दिनी
झुंजुरकाची उठुनी
गेल्या थड्यास धावुनी.
हालेलूया ! ... 2
दृष्टीस दूत तेजस्वी
पडूनी त्यास ऐकवी,
की उठे प्रभू गौरवी,
हालेलूया ! ... 3
न पाहुनी विश्वासती
ती धन्य होत निश्चिती,
जीवन नित्य पावती.
हालेलूया ! ... 4
अती पवित्र हाचि वार !
वाचामने देवाला फार
स्तवुनी मान द्या अपार.
हालेलूया ! ... 5
- जे. टेलर