मराठी
149 पवित्र आत्म्याला आवाहन
पवित्र आत्मनं ! तेजें तुझिया
लाव दीप माझ्या चित्ती ,
घोर, भयंकर निशा पातली,
मार्ग दिसेना या जागती ... ध्रु
ही दु:खाची भयाण रजनी
घालवूनि दूरी आता,
दीननाथा, मुख डाव तुझे मज;
हांस एकदा हे सुमता.
पवित्र आत्मनं; दिव्य बले तव
प्रक्षाली ही पतितमती;
हाय ? जाहले राज्य मधाचे;
मनी येउनि करी वस्ती ... 1
पवित्र आत्मनं; दिव्यानंदे खुलव;
फुलवं या त्रस्त मना;
नको ताप हा; दुःख; मोह मज,
पुरे; घालवी सर्वाना;
आशा ही मम निराश झाली;
मावळली शांतीप्रीती;
भग्न हृदय दु:खार्त होऊनि करिते ;
आत्मनं; ही विनंती ... 2
पवित्र आत्मनं दिव्य सर्व तव,
त्या दिव्यांसह ये सदया !
वास करी मम हृदयमंदिरी;
अशुभ, अमंगल ने विल्या
इहसौख्याची सत्ता भारी
या हृदयी वसली, पुरती
मोडुनी तीते, भोग राज्य तू,
तूंच एकला प्राणपती ... 3
--- मा. कृ. उजगरे