मराठी
150 पवित्र आत्म्याच्या प्राप्त्यर्थ प्रार्थना
विमल आत्मा अति, देवा,
ख्रिस्ताकरिता ... ध्रु
अग्नितुल्यं रसना जरी
आतां न ये आम्हांवरी
तथापि तूं चित्ती भरी
आत्मा पुरता ! देवा ... 1
त्यास भरुनियां मनी
वारी अघे सारी झणी,
ख्रिस्तामधी जगवूनि
देई सौख्यता, देवा ... 2
ख्रिस्तसत्य जाणावया,
तेवी तुझी प्रीती दया,
वचना तुझ्या समजावया
आत्मा दे अतां, देवा ... 3
त्याच्या सहवासे अति
आशा खरी मनाप्रती,
दु:खातही आधार ती,
तैसी मरता देवा ... 4
-- सु. वि. करमरकर