151 पवित्र आत्म्याची स्तुती

मराठी

151 पवित्र आत्म्याची स्तुती पवित्र आत्म्या,स्तवीतो तुजला, संबोधक तूं सत्यची,विमला ! ... ध्रु पसरोनी दव तव कृपेचें विपूलची देशी जीवन नबला ... 1 स्वर्गाचा तूं प्रकाश असशी, वारुनी अघतम हर्षवि सकला ... 2 तव प्रतापे ख्रिस्तप्रीती वाहुनी नदसम शांतवी मजला ... 3 कार्य विभूचे दावुनी मनुजा मानस सुधरी संतत,अतुला ! ... 4 वंदन वंदन नमूनि करितो, गाइन निशिदिनी महिमा अखिला ... 5 ---- सु. वि. करमरकर _________________________________________ 152 पवित्र आत्म्याची चेतना चेतिव आम्हां दीना पवित्र आत्म्या येउनी ... ध्रु हिमवत, अमुची अंत:करणे थंडची गेली होउनी ... 1 ऐहिक लोभे आत्मसुखाची भुरळची गेली पडूनी ... 2 मोहक कितीतरी श्रमवि हृदया अपुल्या पाशे छळुनी ... 3 असशी कपोतासम स्नेहाळू , मनी वस आत्म्या म्हणुनी ... 4 -- सु. वि. करमरकर