153 पवित्र आत्म्याच्या योगे बाप्तिस्मा

मराठी

153 पवित्र आत्म्याच्या योगे बाप्तिस्मा विनवितो सदात्म्या हे, झणी ये तू अंतरी अग्नीने मंडला ह्या बाप्तिस्मा दे परी, अघजाला वारुनिया मनी वस्ती तू धरी, ख्रिस्ताच्या सदूचाची आशा ही तुजवरी ... 1 मूढां ह्या ख्रिस्तज्ञाना पूर्ण तू शिकवी आलस्या मनीच्या या वारुनी चेतवी, हर्षाते भरुनीया दु:खाते घालावी. हृदयाची जुनी वस्त्रे काढुनीया दे नवी ... 2 घोषाया ख्रिस्तकीर्ती सामर्थ्या दे अता सर्वांतें गाजवी तू वार्ता ही सांगता, ख्रिस्तप्रेमास चित्ती विकसु दे सदैवा, करूनी तूं नित्य वस्ती हृदया दे सजीवता ... 3 - सु. वि. करमरकर