154 पवित्र आत्म्याच्या योगे पुनर्जन्म

मराठी

154 पवित्र आत्म्याच्या योगे पुनर्जन्म सदात्म्या मनी ये पुनर्जन्म द्याया, शुद्धचि कराया दासा मज ...1 वायूयोगे जाती जीर्ण पर्ण जेवी वारी अधे तेवी सर्व माझी ...2 हेवा, द्वेष, निंदा, करावीशी वाटे, टोंचती हे कांटे मनालागीं ...3 अंतरी परी तूं अग्निरूपे झणी प्रतापे येऊनि भस्म करी ...4 ऐसा नवा जन्म दीनाला ह्या देई, लावी ख्रिस्ताठायी माझे चित्त ...5 - सु. वि. करमरकर