मराठी
155 पवित्र आत्म्याचे अवरोहण
आत्मयाविण, बापा माणसे दुर्बळ,
अंधळे केवळ आम्ही सारे ...1
परी तो येतांना सर्व भ्रांती उडे,
परमार्थाकडे चित्त वळे ...2
करुनियां कृपा तू त्या सदात्म्यास
धाडुनी प्रकाश दिला दासा ...3
तैसे आतां त्याला ओतीं आम्हांवरी,
तेणे जग भरी, ही विनंती ...4
- सु. वि. करमरकर