मराठी
157 पवित्र आत्म्याची कार्ये
संबोधका, कृपा अपार
तुझी वर्णू जगासमोर,
पितापुत्राकडोनिया
क्षेमास देशी, सदया ... 1
तुझा प्रकाश फांकतो
तदा अंधार संपतो,
दावुनी पापियां भया
तूं नेशी त्यांस आश्रया ... 2
करिशी तू सत्प्रेरणा
तैं जाति दुष्ट भावना,
ही पापसत्ता मोडतो,
संपूर्ण बुद्धि फिरती ... 3
तूं बोलतोसी दु:खितां
आनंद होई पुरता,
क्षणांत वारे शमती,
लाटाही शांत राहती ... 4
- एच . balentine