मराठी
158 प्रकाशदायी पवित्रात्मा
हे सदात्म्या, सत्वरीं
मन्मनी तेजा भरी;
दु:ख भीती निवारी,
घालविं पापांधेरी ... 1
ख्रिस्तमुखा पाहवी,
त्याची शोभा दाखवी,
त्याची गुंजे मला दावं,
रक्त त्याचे मला लाव ... 2
हे सदात्म्या ईश्वरी,
शुद्ध मन्मना करीं,
पाप का हो सर्वकाळ
अंतरी माझ्या प्रबळ ! ... 3
हे सदात्म्या गौरवी,
दु:ख माझें शांतवी,
पापरोग तूं निवार,
तूंच माझा हो आधार ... 4
हे सदात्म्या ईश्वरी,
राही माझ्या अंतरी,
घालवि दुर्बुद्धी घोर,
तूंचि माझा राजा थोर ... 5
-- एच . balentine