159 दिव्यमार्गदर्शक

मराठी

159 दिव्यमार्गदर्शक दिव्य आत्म्या, वाटाड्या, घरी वाट दावाया, यात्रेकरी भक्तांसी, तूं रानांत पाळिसी; कष्टी वाणी ऐकती, फार गोड लागती, म्हणतोस, सुस्वरें, माझ्यामागे ये, त्वरें ... 1 प्रिय सख्या, तूं दयाळ, नित्य करिसी सांभाळ, कधी घोर पडतो, अंधारांत चालतो वादळेही सुटती, धैर्य, आशा खुंटती; म्हणतोस, सुस्वरें, माझ्यामागे ये, त्वरें ... 2 मृत्यूनदी पोहतां, तुला अनुसरता, भवरान सोडणार तैं आकाशी चढणार, तोवरी ही प्रार्थना, तूंच करी करुणा; म्हणतोस, सुस्वरें, माझ्यामागे ये, त्वरें ... 3 - हेफसीबा पी. ब्रूस