मराठी
160 शांतिदाता
किती सदात्मा हो सहाय !
सदा असे मला आधार;
त्यावांचूनि मी निरुपाय,
मनांत भरतो अंधार ... 1
तो देवप्रीती दावितो,
देतो कृपेचा अनुभव;
मनांत शांति तो भरी.
देतो सुखाची दिव्य चव ... 2
दया, दयाळू देवा, कर,
मला आत्म्याचा दे आधार,
तेणे मनांत हर्ष भर.
पुरे मुक्तीचा तो विसार ... 3
- एच balentine