161 पवित्र आत्म्याला विनंती

मराठी

161 पवित्र आत्म्याला विनंती पवित्र आत्म्या, ये, प्रकाश दाखवी, आम्हां दिनांची हृदये कृपेनें शांतवी ... 1 पातके आठवून आम्ही रडावे फार, ख्रिस्ताचे रक्त दाखवून, हे आत्म्या, दे उद्धार ... 2 विश्वासा चेतवी, दूर संदेहा कर, आम्हांमध्ये तूं पेटवी ती प्रीती जी अमर ... 3 दुर्भाव काढुनी मनाला तूं सुधार संपूर्ण नवे करुनी, हे आत्म्या, दे उद्धार ... 4 तूं मुक्ती द्यावया आम्हांत वस्ती कर, तैं बाप, पुत्र, आत्मा, यांस वाखणूं जन्मभर ... 5 - एच balentine