163 सदबुद्धी देणारा दैवी आत्मा

मराठी

163 सदबुद्धी देणारा दैवी आत्मा आत्म्या कृपाळू, तूं उत्तर आम्हांमध्ये प्रकाशा भर, सत्कृपा देई सर्वकाळ, पूर्ण करी तूं प्रतिपाळ ... 1 सन्मार्गी सदा चालवी, पापपाशाला चुकवी; अर्थ शास्त्राचा शिकवी. नेम नीतीचा दाखवी ... 2 देई प्रकाशा सर्वकाळ, सुबुद्धी हृदयांत घाल, उद्भवो देवाची भीती, द्वेषही पापाचा चित्ती ... 3 मनाला तू सुधारोनी त्यामध्ये राही येवोनी, ख्रिस्ताकडे आम्हाला ने, दावी तयाची कुरणें ... 4 देवाकडे पोंचवोनि प्रीती तयाची दावोनी अंती अक्षय्या सौख्याला देइ सदात्म्या, आम्हांला ... 5 - एच . Balentine