मराठी
164 संजीवक पवित्र आत्मा
पवित्र आत्म्या ये, आतां
आम्हांस जीववि,
आम्हां संसारियांमध्ये
सत्प्रीती चेतवी ... 1
सुखी जगीक बुडुनी
जीवात्मे गुंतले,
देवाकडे न पाहता
पापांत रुतले ... 2
उपासना की अर्चना
श्रमाने उर्कितो.
स्तुती, पित्याची प्रार्थना
निरर्थ घोकितो ... 3
प्रभू, असेच मरतां
सदाचं राहू काय ?
तुझी अनंत ममता,
आमुची तिळप्राय ... 4
पवित्र आत्म्या, ये अतां,
मृतांस जीववि,
ही सर्व जड हृदये
प्रितीने चेतवी ... 5
- एच. balentine